125 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा

food
उस्मानाबाद : आज दुपारी मध्यान्ह भोजनातून 125 विद्यार्थ्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात विषबाधा झाली.

वाशी तालुक्यातील छत्रपती शिवाजी विद्यालयात आज इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थांना मध्यान्ह भोजनात बिस्कीटे देण्यात आली. बिस्कीटे खाल्ल्यानंतर 125 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विद्यार्थांना वाशी येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

Leave a Comment