ब्राझील संघाच्या मॅनेजरपदी डुंगाची नियुक्ती

dunga
रिओ डी जानेरो – ब्राझील संघाच्या मॅनेजरपदी दुस-यांदा माजी फुटबॉलपटू डुंगाची नियुक्ती करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जर्मनीने ब्राझीलचा 7-1 असा धुव्वा उडविला होता. प्रशिक्षक लुईझ फेलिप स्कोलारी यांना या नामुष्कीनंतर पद सोडावे लागले. आता त्यांच्या जागी डुंगाची नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले.

1994 मध्ये आपल्या नेतृत्वाखाली 50 वर्षीय डुंगा यांनी ब्राझील संघाला विश्वचषकाचे चौथे जेतेपद मिळवून दिले होते. यापूर्वी ते ब्राझील संघाचे 2010 मध्ये प्रशिक्षक होते. पण त्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ब्राझील संघ उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. `पुन्हा एकदा ही जबाबदारी मिळाल्याने मी अतिशय खूश आहे,’ असे डुंगा पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

ब्राझील, जपान, जर्मनी, इटलीमधील अनेक क्लबकडून त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. 2006 मध्ये त्यांची पहिल्यांदा ब्राझील संघाच्या मॅनेजरपदी (प्रशिक्षक) नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2007 ची कोपा अमेरिका व 2009 मधील कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धा संघाने जिंकली असली तरी 2010 च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व ब्राझीलला हॉलंडकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

Leave a Comment