बॅडमिटन संघाची राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी सलामी

sindhu
ग्लासगो – भारतीय बॅडमिंटन संघाने ग्लासगो येथे सुरु असलेल्या २० व्या राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी सुरवात केली असून बॅडमिंटन स्पर्धेतील ग्रुप बी मधील भारताने घाणाविरुद्धच्या सामन्यात ५-० असा विजय मिळवला आहे.

भारताच्या पी.कश्यपने बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत २७ मिनिटांच्या खेळात घानाच्या डॅनियल सॅमला २१-६, २१-१६ या सेटमध्ये नमवले आणि भारतास विजयी सुरुवात करुन दिली. तर दुसरीकडे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकावलेल्या पी.व्ही.सिंधूनेही स्टेला अमेसहा हिचा २१-७, २१-५ असा पराभव करत भारताला २-० ने आघाडी मिळवून दिली.

भारताच्या अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा या जोडीने पुरुष दुहेरीच्या स्पर्धेत इमॅन्युअल डोंकर आणि अब्राहम इयेट्टी या जोडीला २१-७, २१-११ या सेटमध्ये पराभूत केले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोणप्पा या जोडीने महिला दुहेरीत एवेलिन बोटवे आणि दियाना आर्चेर या जोडीला नमवत भारताची विजयी घौडदौड कायम ठेवली. अखेर मिश्र दुहेरीमध्ये पी.सी.तुलसी आणि के.श्रीकांत या जोडीने सॅम आणि अमेसहा या जोडीचा २१-५ ,२१-९ या सेटमध्ये पराभव करत भारताला घाणाविरुद्धच्या सामन्यात ५-० विजय मिळवून दिला. भारताचा पुढील सामना युगांडाशी होणार आहे.

Leave a Comment