फोर्ब्जच्या यादीत पाचव्या स्थानी धोनी

dhoni
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या नव्या यादीनुसार सध्याची कमाई स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो व लायोनेल मेस्सी यांच्यापेक्षा अधिक आहे. लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर धोनी देशाचा सर्वात मौल्यवान क्रिकेटर ठरला आहे. ही यादी खेळाडूंच्या कमाईच्या निकषावर निश्चित केली जाते. या यादीत सध्या रॉजर फेडरर व टायगर वूड्स संयुक्त अव्वलस्थानी विराजमान आहेत.

फेडरर व वूड्स यांची 2013 मधील कमाई फोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रत्येकी 46 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. 21 दशलक्ष डॉलर्सची कमाई धोनीने केली. ती चौथ्या क्रमांकावरील मारिया शरापोव्हापेक्षा दोन दशलक्ष डॉलर्सने कमी होती. बास्केटबॉल स्टार लेब्रॉन जेम्स (27 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) व फिल मिकेलसन (25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानी राहिले. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो व लायोनेल मेस्सी यांची कमाई 13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

एटीपी वर्ल्ड टूरच्या वेबसाईटप्रमाणे फेडररची लोकप्रियता इतकी आहे की, त्याचा सहभाग निश्चित करण्यासाठी आयोजकांना फेडररच्या व्यवस्थापनाला 1 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम अदा करावी लागते. त्याने नाईके कंपनीसमवेत केलेला 10 वर्षांचा करार तब्बल 100 दशलक्ष डॉलर्सचा आहे, असेही मानले जाते. फेडररच्या खात्यावर विक्रमी 17 ग्रँडस्लॅम जेतेपेद नोंद असून याचवेळी वूड्सने गोल्फमधील 14 महत्त्वाची जेतेपदे पटकावली आहेत.

Leave a Comment