तैवानमध्ये विमानाला अपघात ;५१ ठार

plane
तैपाई – तैवानच्या पेंधु येथे एका प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडींग करताना झालेल्या अपघातात ५१ जण ठार झाले आहेत. तैवानच्या केंद्रीय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

हे विमान तैवानची राजधानी तैपाईहून पेंग्यु बेटावर जात होते . हे विमान ट्रान्स एशिया एअरवेज कंपनीच्या मालकीचे होते. या विमानात एकूण ५४ प्रवाशी आणि ४ क्रू सदस्य होते.

खराब हवामानामुळे हे विमान इमरजन्सी लँडिंग करण्याच्या प्रयत्नात होते. दुसऱ्या प्रयत्नात हे विमान कोसळले असल्याचे सांगण्यात येते. कमी लोकसंख्या असलेले पेंग्यु हे एक छोटेसे बेट असून येथे दिवसातून दोन वेळा विमानाचे उड्डाण होते. रविवारी रात्री तैवानमध्ये मात्मो वादळ आले होते. या वादळाचे केंद्र चीनमध्ये होते. या वादळानंतर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.अपघातानंतर या विमानाने पेट घेतला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment