मुंबई : आपल्या क्वार्टी सीरिजचे फोन 9320,9720 आणि क्यू 5 ची स्मार्टफोन बनविणारी प्रमुख कंपनी ब्लॅकबेरीने गुरूवारी किंमत सहा हजार रूपयांपर्यत कमी केली आहे.
सहा हजाराने कमी झाली ब्लॅकबेरीच्या 3 मोबाईलची किंमत
क्यू 5 मध्ये 30 टक्क्यांनी किंमत कमी झाल्याने 19,990 रूपयांचा फोन आता 13,990 रूपयांत उपलब्ध होणार आहे. क्वार्टी 9320 हा फोन 10 टक्क्यांनी उतरल्याने 11,000 रूपयांवरून त्याची किंमत 9900 रूपयांवर आली आहे. तर क्वार्टी 9720 ची किंमत 15,990 वरून 11,990 करण्यात आली आहे.