संशयास्पद शैलीमुळे विल्यम्सनच्या गोलंदाजीवर बंदी

ken
वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने पार्टटाईम फिरकी गोलंदाज केन विल्यम्सनवर संशयास्पद शैलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजी करू न देण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध न्यूझीलंडला दुस-या कसोटी सामन्यात 10 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी विल्यम्सनच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.

विल्यम्सनची ऍक्शन कार्डिफ मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीने केलेल्या चाचणीत आयसीसी नियमांचा भंग करत असल्याचे दिसून आले. जितक्या फ्लेक्सला संमती आहे, तो नियमाचा त्यापेक्षा 15 डिग्रीनी भंग करतो, असे चाचणीत स्पष्ट झाले. त्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने त्याच्या गोलंदाजीवर बंदी जाहीर केली. फलंदाज या नात्याने तो आताही संघात सहभागी होऊ शकेल. पण, पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी त्याला प्रथम आपली शैली बदलावी लागेल, असे स्पष्ट संकेत आहेत.

Leave a Comment