पोळ यांची होणार उच्चस्तरीय चौकशी

pol
मुंबई : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी अंधश्रद्धा निमरूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांच्या शोधासाठी ‘प्लँचेट’ केल्याच्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी यासाठी दोन दिवसांत अधिका-यांची नियुक्ती केली जाईल. तथापि, तो महाराष्ट्र पोलीस सेवेबाहेरील असावा का, याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे सांगितले.

पुण्याच्या आयुक्तांकडून याप्रकरणी झालेले आरोप गंभीर असून त्याबाबत मंगळवारी आपल्याकडे पत्र प्राप्त झाले आहे. याविषयी उच्चस्तरीय अधिका-यांकडून तपासणी केली जाणार आहे. तपास अधिकारी महाराष्ट्र पोलीसातील असावा की बाहेरील याबाबत चर्चा सुरू असून सर्व बाबींची विचार करून अधिका:याची नियुक्ती केली जाईल, असे दयाळ म्हणाले.

Leave a Comment