इस्लामाबाद : तालिबानी दहशतवाद्यांविरूध्द पाकिस्तानी लष्कराने तीव्र माहिम उघडली असून, बुधवारी उत्तरी वजीरीस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 13 तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तालिबानी दहशतवादी ठार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरी वजीरीस्तानातील डोंगराळ भागात पाक लष्कराने हवाई हल्ले करून दहशतवाद्यांचे सहा अड्डे उध्वस्त केले. त्यात 13 दहशतवादी ठार झाले. या कारवाईत आतापर्यंत 400हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाक लष्कराने तालिबानी दहशतवाद्यांविरूध्द तीव्र माहिम उघडली आहे.