‘गोल्डन टोबॅको’चा अध्यक्ष गजाआड

dalmia
मुंबई : मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोटयावधी रूपयांची फसवणूक करून परदेशात पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेला गोल्डन टोबॅको कंपनीचा अध्यक्ष संजय दालमिया याला अटक केली आहे.

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत 2012 मध्ये दालमियासह अन्य काही जणांविरोधात 540 कोटी रूपयांचा फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दालमियाचा जामिन अर्ज या वर्षी मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत 11 एप्रिल पूर्वी त्याला पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. ही मुदत संपल्यानंतर दालमियाच्या विरोधात लुकआऊट नोटीसही बजावण्यात आली होती. कोलकाता विमानतळावरून परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Comment