कोंबडी पालनातील पथ्ये

hen
कोंबडी पालन व्यवसायाला खूप वाव आहे. आपल्या देशामध्ये लोकांचे राहणीमान वाढत चालले आहे. ते जस जसे वाढत जाईल तस तसे त्यांचे खाणे-पिणे सुधारत जाणार आहे आणि त्यांच्या हातात पैसा यायला लागला की, तो पैसा चांगल्या चुंगल्या खाण्या-पिण्यावर खर्च होणार आहे हे नक्की. अगदीच दारिद्य्र रेषेखालील जीवन जगणार्‍या माणसाला मिळेल ती चटणी-भाकरी खाऊन जगावे लागते. पण त्याच्या हातात चार पैसे आले की तो भाजी, डाळी, दूध यांचा वापर करायला लागतो. त्यांच्याकडून ङ्गळांची आणि मटणाची मागणीही वाढायला लागते. त्यामुळे कोंबडीचे मांस आणि अंडी यांचा वापर आणि मागणी वाढत जाणार आहे. कोंबड्या पाळल्यास अंडी खपतील की नाही, असा काही प्रश्‍न उद्भवत नाही. अंडी खपत आहेत आणि कोंबड्याही खपत आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर सुद्धा अंड्याचे आम्लेट आणि चिकन मोठ्या प्रमाणावर विकले जात असते ते तर आपण पहातच आहोत. गेल्या ३० वर्षांपासून कोंबड्यांची अंडी आणि मांसल कोंबड्या यांची मागणी सातत्याने वाढत चालल्यामुळे अंड्याच्या उत्पादनात साडेपाच टक्के तर कोंबड्यांच्या उत्पादनात साडेबारा टक्के वाढ दरसाल झालेली आहे.

कोंबड्या पाळण्याच्या व्यवसायामध्ये सध्या भारतात १५ लाखांपेक्षाही जास्त लोक गुंतलेले आहेत. परंतु शेळी पालन आणि कोंबडी पालन या दोन व्यवसायामध्ये एक छोटासा ङ्गरक आहे. शेळी पालनात प्रामुख्याने शेळी किंवा बोकूडच विकला जातो आणि हा विक्रीचा व्यवहार अधूनमधून करावा लागतो. कोंबड्यांच्या व्यवसायामध्ये मात्र अंड्यांची विक्री दररोज करावी लागते. म्हणजे विक्री व्यवहार हा रोजचा व्यवहार असतो. या दोन व्यवसायातला आणखी एक मोठा ङ्गरक म्हणजे शेळ्यांचा व्यवसाय ङ्गारसा नाजूक नाही. कोंबड्यांचा मात्र थोडासा नाजूक आहे. तेव्हा कोंबड्या पाळताना कोंबड्यांचे रोग, त्यांची औषधे आणि उपचार यावर शेळ्यांपेक्षा थोडे जास्त लक्ष द्यावे लागते. भारतामध्ये अजूनही दरमहा सरासरी दरडोई ६०० ग्रॅम मांस खाल्ले जाते.

अमेरिकेत आणि चीनमध्ये हे प्रमाण ङ्गारच आहे. पण जागतिक सरासरी सुद्धा भारतापेक्षा किती तरी जास्त आहे. जगामध्ये दरमहा दरडोई साडेदहा किलो मांस खाल्ले जाते. अंड्यांची स्थिती अशीच आहे. भारतात दरवर्षी दरमाणशी ३६ अंडी खाल्ली जातात. पण याबाबतीत जगाची सरासरी १५० अंडी एवढे आहे. शहरांमध्ये अंडी आणि मांस विकणे सोपे जाते. त्यामुळे जे काही थोडे लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत ते मांस विक्रीची आणि अंडी विक्रीची सेवा प्रामुख्याने शहरामध्येच पुरवताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातले मांसाचे मार्केट अजून म्हणावे तसे वापरले गेलेले नाही. ग्रामीण भागात मटण किंवा चिकन म्हणाव्या तेवढ्या सहजतेने उपलब्ध होत नाही. तेव्हा कोंबडी पालनाच्या व्यवसायात शिरणार्‍यांनी अजूनही ग्रामीण भागातल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले तर त्यांना चांगले मार्केट मिळू शकेल. हा व्यवसाय हा शेळी पालनापेक्षा थोडा नाजूक आहे हे खरे. परंतु त्यामुळे तो करणे ङ्गार अवघड आहे असे काही नाही. योग्य ती दक्षता घेतली की, हे नाजूक काम सुद्धा पार पडते. शेतकर्‍यांच्या तरुण मुलांसाठी हा व्यवसाय ङ्गार उत्तम आहे. शिवाय घरच्या घरी या व्यवसायाचे महिलांकडून सुद्धा व्यवस्थापन होऊ शकते.

ज्यांना या व्यवसायात पडण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या जवळपासच्या तालुक्याच्या ठिकाणी कुक्कुट पालनाचे अभ्यासक्रम होत असतात, त्या अभ्यासक्रमांना जरूर प्रवेश घ्यावा. अभ्यासक्रम कोठे आणि कसे भरवले जातात याची माहिती अनेकदा वृत्तपत्रात सुद्धा छापून येत असते. तिच्यावर लक्ष ठेवावे आणि या उपरही अधिक माहिती हवी असल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या पशु संवर्धन अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. काही शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. अशा शेतकर्‍यांना कोंबडी पालनाची अगदी प्राथमिक सुद्धा माहिती नसेल तर त्यांनी एकदम मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय न केलेला बरा. छोट्या प्रमाणावर आधी सुरुवात करून या धंद्याचे स्वरुप, त्यातल्या कामांचे वेळापत्रक आणि तो करताना येणार्‍या व्यावहारिक अडचणी या सगळ्यांची माहिती करून घ्यावी. त्या अडचणींवर कशी मात करावी, याची प्रत्यक्षात माहिती आणि अनुभव घ्यावा आणि नंतरच मोठ्या प्रमाणावरच्या व्यवसायाला हात घालावा. अन्यथा काहीच माहीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावरच्या व्यवसायात मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.

पूर्वीच्या काळी कोंबडी पालन व्यवसाय म्हटल्याबरोबर लोक सबुरीचा सल्ला देत असत. कारण पिंजर्‍यात पाळलेल्या कोंबड्यांना एखादा साथीचा रोग झाला की, पटापट सगळ्याच कोंबड्या मरून जातात, असा प्रवाद होता. परंतु आता बर्ड फ्लू असा एक विकार वगळता अन्य कसल्याची आजाराची भीती राहिलेली नाही आणि अशा साथीच्या आजारात पटापट सगळ्याच कोंबड्या एकदम मरून गेलेल्या आहेत असे कोठे ऐकिवात आलेले नाही. औषधोपचारामुळे हे शक्य झालेले आहे. कोंबडीच्या व्यवसायापासून सेंद्रीय शेतीच्या दृष्टीने एक ङ्गायदा चांगला होतो. तो म्हणजे कोंबडीचा खत. कोंबड्या पाळलेल्या पिंजर्‍यामध्ये जमिनीवर शेंगांचा भुस्सा अंथरलेला असतो आणि कोंबड्यांचे मलमूत्र त्या भुश्यातच मिसळून भुश्याचा पूर्ण भुगा होऊन जातो. हा मलमूत्रयुक्त भुगा सेंद्रीय खत म्हणून अतिशय उपयुक्त असतो. १५-२० वर्षांखाली याविषयी लोकांना ङ्गार माहिती सुद्धा नव्हती. परंतु आता मात्र या खताचे महत्व कळलेले आहे आणि चढाओढीने हा खत विकत घेतला जात आहे. कोंबडी पालन व्यवसाय करणार्‍यांना हा खत आपल्या शेतात वापरता येईल. पण शेत नसेल तर हे खत हा सुद्धा एक उत्पन्नाचा मार्ग होईल.