कॉंग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच

chvan
पुणे : एकीकडे राष्ट्रवादीकडून जागावाटपाबाबत होणाऱ्या दबावतंत्राला धुडकावून कुठल्याही परिस्थितीत कॉंग्रेस बळी पडणार नाही असे स्पष्ट संकेत देणाऱ्या कॉंग्रसपक्षाने आघाडीचा धर्म बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी येत्या ५ ते ७ ऑगस्टदरम्यान जाहीर करणार असल्याचे जाहीर केले आहे. पुण्यात आयोजीत विभागीय काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यासाठी मुख्य़मंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक मंत्री उपस्थित होते. मेळाव्यानंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी यादीबाबत थेट भूमिका जाहीर करण्यात आली. यावेळी विधानसभा जागावाटपाबाबत राष्ट्रवादीच्या अल्टिमेटमविषयी माणिकराव ठाकरेंना विचारणा करण्यात आली. तेव्हा राष्ट्रवादीला एकही जागा वाढवून दिली जाणार नाही, असे सांगत ठाकरेंनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.परिणामी एका बाजुला राष्ट्रवादीकडून जागा वाढवून मिळण्यासाठी दबावतंत्र सुरु असताना काँग्रेस मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या या स्पष्टीकरणाला 144 जागांसाठी आग्रही असलेले राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सर्वच पक्षांनी आगीम विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असताना काँग्रेसही या स्पर्धेत मागे राहायला तयार नाही . त्यात भाजपकडून पहिली यादीची संभाव्य तारीख जाहीर केली असतानाच आता काँग्रेसनेही तारीख जाहीर केली आहे.

येत्या 5 ते 7 ऑगस्टदरम्यान काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहिर होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले . त्यामुळे एका बाजुला जागावाटपाचा घोडं अडले असतानाच काँग्रेस उमेदवार यादीची घोषणा करून कॉंग्रेसचे मनसुबे काय ? हा प्रश्न महत्वाचा ठरला आहे.

Leave a Comment