राजीव गांधी आरोग्य योजनेत भ्रष्टाचार

rajiv-gandhi
सांगली – राजीव गांधी आरोग्य योजनेच्या अंतर्गत शासकीय रुग्णालयात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. या योजनेच्या औषधांचा बेकायदा साठा रूग्णालयात सापडली आहेत. अन्न व औषध विभागाने सिव्हिल हॉस्पिटलवर छापा टाकून हा बेकायदा साठा जप्त केला आहे.

सांगलीच्या शासकीय रुग्णालयात राजीव गांधी आरोग्य योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या योजनेच्या औषधांचा विनापरवाना साठाच शासकीय रुंगालायात आढळून आला आहे. त्याचप्रमाणे मोफत दिली जाणारी औषधांची विक्री केली जात असल्याच्या संशयावरून अन्न औषध प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलवर छापा टाकला.

या छाप्यात सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आठ लाखाचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप या औषधांची मोजणी सुरु असून साठा केलेल्या औषधांच्या साठ्याची किमत आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment