मोदींविरोधात शिख फॉर जस्टीसचे आंदोलन

sikh
वॉशिग्टन- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ३० सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये बैठकीसाठी दिलेल्या निमंत्रणाच्या विरोधात येथील शिख मानवाधिकार संघटनेने शिख फॉर जस्टीसच्या माध्यमातून ऑन लाईन आंदोलन सुरू केले आहे. याच संघटनेने माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधातही असेच आंदोलन छेडले होते.

या आंदोलनाद्वारे बराक ओबामा यांनी मोदींना दिलेले निमंत्रण रद्द करावे अशी याचिका केली गेली आहे. गुजराथ मध्ये २००२ च्या हिंसाचाराबद्दल असे म्हटले गेले आहे की आजपर्यंत या कारणाने अमेरिकेने मोदींना व्हिसा दिला नव्हता. त्यामुळे आता ओबामांनी त्यांना मेजवानीचे निमंत्रण देण्यापेक्षा मोदींची निंदा केली पाहिजे. मुस्लीम, शीख, यहुदींविरोधात भाजपने हिंसेला प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे भाजपवर प्रतिबंध लावा. या ऑनलाईन आंदोलनात २० ऑगस्टपर्यंत किमान १ लाख जणांनी सह्या केल्या तर त्याची दखल व्हाईटहाऊसला घ्यावी लागेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment