पाकला अमेरिकेची ९३ लाख डॉलर्सची जादा मदत

wazirstan
उत्तर वझिरीस्तानात सुरू असलेल्या दहशतवादी विरोधी लष्करी अभियानात विस्थापित व्हावे लागलेल्या १ लाखांहून अधिक नागरिकांसाठी अमेरिकेने पाकला ९३ लाख डॉलर्सची जादा मदत दिली जात असल्याचे जाहीर केले आहे. तालिबान विरोधात पाक सरकारने सुरू केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईमुळे या भागातील अनेक गांवातील नागरिक गांवे सोडून बाहेर पडले आहेत. मात्र त्यानी जेथे आश्रय घेतला आहे, त्या भागात आरोग्य, स्वच्छतेच्या सोयी अतिशय अपुर्‍या आहेत.

पाकमधील अमेरिकी दूतावासातील राजदूत रिचर्ड ओल्सन म्हणाले की जादा अनुदान युनायटेड स्टेटस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून दिले जात आहे. त्याचा उपयोग विस्थापितांसाठी आरोग्य, वैद्यकीय, स्वच्छता, पाणी तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे. अमेरिकेने या विस्थापितांसाठी दिलेल्या अनुदानाचा आकडा आता १ कोटी ७३ लाखांवर गेला असल्याचेही ओल्सन यांनी सांगितले.

Leave a Comment