चीनमध्ये मॅकडी, केएफसी, स्टारबकची प्रतिष्ठा पणाला

kfc
जागतिक फास्टफूड चेन मॅकडोनल्डस, केएफसी, स्टारबक, पिझ्झा हट यांची प्रतिष्ठा चीनमध्ये पणाला लागली आहे. आपल्या पदार्थांत सडलेल्या मांसाचा वापर या कंपन्यांनी केल्याचा आरोप असून त्याविषयीचा तपास अन्न आणि औषध विभागाकडून जोरात सुरू आहे. मांसाविषयीची तक्रार आल्यानंतर सर्व फास्ट फूड चेनची तपासणी केली जात असून सडलेल्या मांसाचा मोठा साठा पूरवठादार शंघाई हुसी कंपनीतून जप्त करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

प्रथम टोकियोमधून मॅकडोनल्डच्या चिकन मेकनगट मध्ये सडलेले मांस वापरून विक्री केले जात असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर थायलंड आणि चीनमध्येही अशा तक्रारी आल्यावर मेकडोनल्डने त्यांचे कांही पदार्थ बाजारातून मागे घेतले आहेत स्टार बकनेही त्यांची कांही उत्पादने बाजारातून मागे घेतली आहेत. चीनच्या सियुचिन प्रांताची राजधानी चेंगदू येथील हुसी कंपनीतून ९.६ टन वजनाचे मांस जप्त करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सडलेल्या मासाचा वापर करून वरील कंपन्यांनी पदार्थ बनविल्याचे सिद्ध झाले तर या कंपन्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल.

Leave a Comment