सप्टेंबरपर्यंत कायम राहणार मेट्रोचे दर

mumbai-metro
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईकरांना एक दिलासादायक बातमी दिली असून येत्या सप्टेंबरपर्यंत मेट्रोचे सध्याचे दर कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

दरवाढ करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला होता. राज्य सरकारने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत मेट्रोचे सध्याचे दर कायम ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या याचिकेवर येत्या 1 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

मेट्रोचे सध्याचे दर 10, 15, 20 असे आहेत. ते दुप्पट करण्याची मेट्रो प्रशासनाची मागणी आहे. येत्या 1 सप्टेंबरला या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment