शेळी पालनाचे तीन प्रकार

goat
शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही ङ्गायदे आहेत आणि काही दोषही आहेत. ङ्गायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्‍नच नसतो. मात्र या पद्धतीने ङ्गार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्‍याला शेळी पालनाचा उद्योग ङ्गार मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्‍यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्याला बंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.

त्याशिवाय ज्या शेतकर्‍यांना पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकर्‍यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते. त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंद केल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हा प्रकारच अधिक व्यवहार्य ठरणार आहे. मोकाट शेळी पालनामध्ये आंतरप्रजनन होत असते. त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो. पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजनानवर नियंत्रण ठेवू शकतो. बंदिस्त पालनात शेळ्यांच्या चार्‍यावर आणि आहारावर खर्च होतो ही गोष्ट खरी आहे. परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन भराभर वाढत जाते. जी गोष्ट मोकाट शेळी पालनात शक्य नाही. बंदिस्त शेळी पालनाचा आणखी एक ङ्गायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. बंदिस्त शेळीपालन करणार्‍यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा. या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत. निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूने कुंपण असलेले असावे. म्हणजे काही काळ शेळ्या छपराच्या गोठ्यात राहतील आणि काही काळ मोकळ्या हवेला छप्पर नसलेल्या गोठ्यात येतील.

कोंबड्याप्रमाणे त्यांना चोवीस तासात छपराच्या गोठ्यात बांधण्याची गरज नाही. गोठा थोडा उंचावर बांधावा. त्यात हवा खेळावी यासाठी आजूबाजूला जाळी असावी. तसेच पावसाचे पाणी गोठ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सिमेंट पाईपचे दोन अर्ध गोलाकार तुकडे करून त्यांच्या गव्हाणी बनवाव्यात. त्या गव्हाणीमध्ये चारा आणि खुराक टाकता यावा. अशाच पाईपाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठीही करता येईल. हा गोठा बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गोठा बांधण्यासाठी ङ्गार खर्च करू नये. क्रॉंक्रिटच्या भिंती, सिमेंटचे पत्रे यांची काहीही आवश्यकता नाही. मात्र कोणाला हौस म्हणून पॉश गोठा बांधायचा असेल तर त्यांना कोण अडवणार ? परंतु अशा गोठ्यावर होणारा खर्च हा अनुत्पादक खर्च असतो आणि तो शेळ्यांच्या व्यवसायातून वसूल होणे अवघड जाते. मग नफ्या-तोट्याचे गणित बिघडते. शेळी पालन उद्योगामध्ये शेळीचे आरोग्य हा विषय सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे शेळीचा गोठा तयार करताना आरोग्याचा विचार करावा लागतो. विशेषत: शेळ्यांचे मलमूत्र त्या गोठ्यात साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.

अजूनही बर्‍याच शेतकर्‍यांमध्ये शेळ्यांच्या मरण्याविषयी काही गैरसमज आहेत. शेळ्यांना रोग होऊन त्या पटापट मरतात असे बर्‍याच लोकांना वाटते. मात्र असे शेळ्या मरण्याचे प्रकार ङ्गार अपवादात्मक असतात. परंतु असा एखादा प्रकार घडला की, त्याच्या बातम्या वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणावर छापून येतात आणि आधीच असलेला गैरसमज अधिक दृढ होतो. याचा अर्थ शेळ्या मरत नाहीत असा नाही, तर असे प्रकार ङ्गार कमी असतात आणि शेळ्यांच्या विविध रोगांसाठी द्यावयाच्या लसी वेळेवर दिल्या तसेच अधूनमधून आवश्यक असलेले औषध त्यांना देत गेलो तर शेळ्या मरण्याची शक्यता नसते. शेळ्यांच्या अंगावर गोचीड, पिसवा, उवा, लिखा यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अधूनमधून गोचीडनाशक पाण्याची आंघोळ घालावी. शेळ्यांना जंतनाशक औषध सुद्धा पाजावे लागते. ते वर्षातून दोनदा पाजले जाते. अशा औषधांची माहिती आणि उपचार यासंबंधी आपल्या नजिकच्या जनावरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करावी. त्यातल्या काही लसी या दवाखान्यात मिळत असतात. त्यांचा वापर करावा.

शेळ्यांवर असा इलाज करूनही शेळी काही अनामिक कारणाने मरू शकते. तिच्या अशा मृत्यूनंतर तिची भरपाई मिळण्यासाठी शेळीचा विमा उतरवावा. मध्येच शेळी अचानक मेली तर विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वाव आहे आणि शेतकर्‍यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते हेही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था शेळी पालनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करीत आहेत. ज्या शेतकर्‍यांना बंदगोठा शेळी पालन करण्यामध्ये रूची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकर्‍यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्ङ्गत काही माङ्गक ङ्गी घेऊन भरवल्या जाणार्‍या १२ दिवसांच्या शेळीपालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेळी पालनाविषयीच्या सर्व अंगोपांगांची माहिती त्रोटक स्वरुपात का होईना पण मिळू शकते.

सांघिक शेळीपालन

शेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचे पूर्ण शरीरच उपयोगाचे असते. आपण ङ्गक्त मटणाचा विचार करतो. पण शेळीची कातडी, शिंग, खूड, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचारच करत नाही. हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. शेळीच्या कातडीचा उपयोग तर कसा होतो असतो हे आपल्याला माहीतच आहे. पर्स, बॅगा तयार करण्यासाठी ही कातडी वापरली जाते. त्यानंतर हाडे. बर्‍याच जणांना हाडांचा एक उपयोग माहीत आहे, तो म्हणजे खत म्हणून. कोणत्याही जनावरांच्या हाडांची भुकटी शेतामध्ये खत म्हणून उपयुक्त असते. परंतु शेळीच्या हाडांची पावडर टूथ पेस्टमध्ये मिसळली जाते. म्हणजे आपण ज्या टुथपेस्टने दात घासतो तिच्यात शेळीच्या हाडांची पावडर मिसळलेली असते. हाडांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे टुथपेस्टमध्ये ती मिसळली की, त्या टुथपेस्टमुळे दात मजबूत होतात, हा त्यामागचा विचार असतो. बरेच शाकाहारी लोक शाकाहाराची कडक पथ्ये पाळत असतात. त्यातल्या ज्या लोकांना टुथपेस्टमध्ये हाडे असतात हे माहीत असते ते लोक टुथपेस्टने दात घासत नाहीत ते यामुळेच. शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तू परदेशात पाठविल्या तर त्यांना चांगली किंमत येते.

आपण एखादी शेळी किंवा बोकड दोन किंवा तीन हजाराला विकून टाकतो, परंतु शिंगांचा योग्य वापर करणारा मासूण नुसत्या शिंगापासून दोन हजार रुपये कमवू शकतो. तशीच अवस्था खुरांची सुद्धा असते. शेळीच्या आणि बोकडांच्या खुरापासून शर्टाच्या गुंड्या (बटन) बनवल्या जातात. मेंढ्यांच्या केसापासून लोकर तयार होते हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु शेळीचे केस सुद्धा उपयुक्त असतात. या केसापासून पश्मिना नावाचा कपडा तयार होतो. हा कपडा ङ्गार महाग असतो. विशेषत: कोटांच्या आतल्या बाजूला अस्तर म्हणून पश्मिना कापड वापरले जाते. पश्मिना कापडाच्या शाली आणि गरम कपडे ङ्गार महाग असतात. पश्मिनाचे एखादे स्वेटर साधारणत: हजार रुपयांना विकले जाते. शेळीच्या केसापासून हा कपडा तयार करण्याचे कसब काश्मीर आणि तिबेटमधल्या काही विशिष्ट कलाकारांनाच अवगत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी आपल्या शेळ्या निव्वळ विकून न टाकता सामूहिकरित्या कत्तलखाने उभे केले तर शेळीचे केस, खूर, शिंग, हाडे आणि चामडी या सर्वांचे पैसे शेतकर्‍यांच्याच पदरात पडू शकतील. म्हणून शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आपले स्वत:चेच कत्तलखाने उभे करणे ङ्गायद्याचे ठरणार आहे.

114 thoughts on “शेळी पालनाचे तीन प्रकार”

  1. सर मला बंदिस्त शेळी पालन करायचं आहे , घरची 5 एकर कोरड वहू जमीन आहे. सर माझी शेळी पालन करण्याची तीव्र इच्छा आहे. मार्गदर्शन दिले तर आपला सदैव आभारी राहीन.
    Whatsapp no.9423286080

  2. Shyam kisanrao chimne

    शेळी पालन विषयी ग्रुप असेल तर अँड करा प्लीज
    9049392727

  3. कृपया मला बंदिस्त GOAT FARMING व योजणा बद्दल सविस्तर माहिती द्यावी.मी अमरावती जिल्हातील रहवाशी आहे.
    माझा what’s app no. +918600868767 मला add करा.

  4. कृपया मला GOAT FARMING विषयी सविस्तर माहीती द्यावी, आणि योजणा बद्दल सुद्घा . माझा what’s app no. +918600868767. कृपया add करा.

  5. सर नमस्कार….
    सर माझ्याकडे ५ एकर शेती आहे.मला मोठया प्रमाणात बंदीस्त शेळीपालन करण्याची इच्छा.आहे.माझे गाव लातूर जिल्हात येते.या जिल्हासाठी कोणत्या जातीची शेळी उपयुक्त ठरेल.कृपया मार्गदर्शन करावे.

  6. सर मला बंदिस्त शेळी पालन करायच आहे तरी मला मार्गदर्शन करावे मझा what’s no 8087776187

  7. Bhushan Jalindar Adhav

    Whatsup group la maza nunber add kra
    Mla sheli palan krayche ahe
    Whatsup number.9623574726

  8. रामदास देशमूख

    मला शाली पालन करायचे आहे तरी मला मार्गदशन करावे ७७२०९४७३८१
    रामदास किशनराव देशमूख

  9. मला शेळीपालन करण्यासाठी सविस्तर माहिती मिळावी हि विनंती . pls add kara what’s up group Var No-8600605094

  10. सर मला शेळी पालन हा व्यवसाय करायचा आहे मला आपले मार्गदर्शन हवे..
    What’s App Number 9822771464

  11. सर मला बंधिस्त शेळीपालन व्यवसाय करायचा आहे , सविस्तर माहिती हवी !
    माझा मों नंबर -9503757966 मला शेळीपालन what’s up गृप असेल तर add करावे please

  12. Mala sheli palan Badal mahiti Havi ahe ani mala plant ubha karaycha she

    From D r pawar my what’s app no 9823205472

  13. ऋषिकेश मराठे

    सर मला शेळी पालन करायचे आहे मला मार्गदर्शन द्या माझा मोबाईल नो 9503246934

  14. संदीप कुंभार

    मला शेळीपालनाविँषयी माहीती मिळावी मो 8806751451

  15. संदीप कुंभार

    मला शेळी पालनाविषयी माहीती मिळावी

  16. Satish Mukesh Tembhare

    सर मला बंदिस्त शेळी पालन करायचं आहे , घरची दोन एकर जमीन आहे पाणीही आहे. सर माझी शेळी पालन करण्याची तीव्र इच्छा आहे. मार्गदर्शन दिले तर आपला सदैव आभारी राहीन. मो. नं.8411019814 व मी गोरेगाव तालुक्यात राहतो जिल्हा गोंदिया 441801

  17. Satish Mukesh Tembhare

    सर मला बंदिस्त शेळी पालन करायचं आहे , घरची दोन एकर जमीन आहे पाणीही आहे. सर माझी शेळी पालन करण्याची तीव्र इच्छा आहे. मार्गदर्शन दिले तर आपला सदैव आभारी राहीन. मो. नं.8411019814

  18. Saser maybi bakri paalna ki khob icca hai par kya karo paysa ki kami ke karan himmat nahi kar paara ho mare paas pani ki aur zamin ki koi kami nahi hai par payse aur nawlag ki kami hai bas mujko koi batay ke kyse bank lone milta hai aur kyse bakri palan kar sakte hai bas itni hi jankari chaiye jo koi bataynga bhgwan usko khose rhke aur sukriya

  19. मला शेळीपालन विषयक नागरिकांचा ग्रुप असल्यास त्यात add करावे
    उस्मानाबादी &राजस्थानी शेळी मिळतात त्याच्या पत्ता मिळाला तर बरे होईल , पाटस ता दोण्ड,जि पुणे

  20. समीर जाधव

    व्हाट्सप ग्रुप माधें ऍड करा 8796201909

  21. नितिन पाटील

    whats App गृप असेल तर कृपया मला अॅडव्हें करा 9673752969

  22. नितिन पाटील

    whats App गृप असेल तर कृपया मला अॅडव्हेंचर करा 9673752969

  23. सर मला शेळी कोठे कोणत्या जातीच्या कोटे उपलब्ध अ शतात याची माहिती द्यावी मि आपला खूप आभारी राहिल

  24. मला शेळीपालन विषयक नागरिकांचा ग्रुप असल्यास त्यात add करावे
    हि विनंती

  25. मला शेळी पालन करायचे आहे तरी मला कर्ज कसे मिळेल
    mo 9860488126

  26. मला शेली पालनकर्ता माहिती पाहिजेय 7045838803

  27. Gaikwad shrikrushna mahadeo

    सर मला शेळी पालन करायचे आहे तरी मला कर्ज कसे मिळेल
    My mobile no- 8888132077
    Whats app no 9822526407

  28. राजू वैरागडे

    माझ्या कडे २ एकर शेत आहे व मला शेळी पालन करायचे आहे.करिता मला माहीती सुचवावी

  29. मला शेळीपालन विषयक नागरिकांचा ग्रुप असल्यास त्यात add करावे
    हि विनंती

  30. राजेश तांडेकर (नागपुरवरुन)

    मला नागपुरमध्ये शेळी विक्रीचे बाजारपेठ, आणि कातळी,शिंगे, हाळ, यांची विक्री केंद्राचा पत्ता मिळेल काय?

  31. सर मला शेली पालन करायचे आहे प्लीज़ मला त्या बद्दल माहिती दया

  32. समीर धाडवे

    मला शेळीपालन विषयक नागरिकांचा ग्रुप असल्यास त्यात add करावे
    हि विनंती

  33. वैभव पिसे

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे.हे ऐकून मला पण वाटते शेळी पालन करावे.

  34. सर मला शेळि पालन करायच आहे.पण त्याच्या वेगवेगळ्या प्रजाति कुठून मिळतील आणि त्याना किती खर्च येइल? मार्गदर्शन दिले तर तुमचा मी फार आभारी राहिण सर….!

  35. सिताराम वगदे

    सर वैजापुर मधील बीएसी अॅर्गी शेतकरी आहे मला शेळी पालन करायचे आहे तरी मला मार्गद्शन द्या व काही सरकारी कर्जाची माहिती द्या
    मो नं 9822628574/9764133530

  36. सर मला शेळी पालन करायचे आहे.
    तर मला सल्ला द्यावा अशी माझी नमृ विनंती आहे
    My mobile no – 7038510050

  37. चंद्रकांत निंगप्पा कुबसंगे

    मला बंदिस्त शेळी पालन करायच आहे माझ गाव सोलापुर मधे आहे शेती आहे
    तर मला योग्य माहिती पाहीजे माझा मोबाइल नंबर
    9421818490

  38. चंद्रकांत निंगप्पा कुबसंगे

    सर मलाही शेळी पालन करायचे आहे
    आपले मार्गदर्शन हवे आहे.
    My mo.9421818490

  39. सर मलाही शेळी पालन करायचे आहे
    आपले मार्गदर्शन हवे आहे.
    My mo.9421818490

  40. subhash rameah Jagtap

    शेळी पालनासाठी कर्ज कसे घ्यावे मार्गदर्शन करावे.

  41. सुनिल आरडे

    सर मलाही शेळी पालन करायचे आहे
    आपले मार्गदर्शन हवे आहे.
    My mo.8055434380
    7038772369

  42. WhatsApp group आहे शेळी पालन विषयक माहितीची देवाणघेवाण व मोठ्या प्रमाणात माहितीची देनारा group आहे तर आपण हा group join करा शेतकरी मित्र नो
    WhatsApp no 9561053918

  43. मला पण शेळी पालन करायचे अाहे माहीती हावि

    sagar gavhane

  44. मला पण शेळी पालन करायचे अाहे माहीती हावि

  45. शेळी पालन विषयक माहितीची देवी अहमदनगर जिल्ह्यातील बोअर जातीचा शेळी पालन आहे का? तर त्या शेतकरी बंधू चा मोबाईल नंबर द्या

  46. Mi Shelipalan Kari Ichito Mla Aaple Margadarshan Have My What’s App Number 7798019460

  47. सर मला शेळी पालन हा व्यवसाय करायचा आहे मला आपले मार्गदर्शन हवे..
    What’s App Number 7798019460

  48. Jitendra patil Dhule

    सर, खुप छान सल्ला दिला मला पन शेळी पालन करायच आहे. तरी मि सुरुवात कीती शेळ्यांपासुन करावी.mo.7249473408

  49. मंगेश कदम

    मी सिंधुदुर्ग येथील राहनारा आहे मला शेली पालन हा उद्योग करायचा आहे. या सबंधिचि माहिती मला कुठे मिळेल ते संगा व प्रशिक्षण कुठे भेटल ते कलवा

  50. ऐश्वर्य मांजरेकर

    सर मला शेळी पालन करायच आहे मी सिंधुदुर्ग जिल्हात राहतो मला मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे माझा What’s app no 9158140408

  51. विनोद बोरसे&महेद् बोरसे

    मि रा सात्री ता अमळनेर जि जळगाव माझ्या कळे उस्मानाबादी &राजस्थानी बकरी विकत मिळतात 9561278009 7350509938

  52. सुनिल ठाकरे

    मला पण शेळीपालन व्यवसाय करायचा आहे पण मला लोन मिळू शकते का? याबद्दल मला माहिती द्यावी मी नाशिकचा आहे मो.नं. ७७५६०००७७६

  53. माऊली सायकर

    बोअर & दमास्कस जातीच्या शेळया व बोकड मिळतील
    मो:- ९९७५७६७११९

  54. ऋषिकेश पिंगळे

    लेख खुप छान आहे
    काही प्रश्नांची उत्तरे वाचाला आवडली आसती

  55. ऋषिकेश पिंगळे

    लेख खुप छान आहे तसेच आलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचाला आजुन आवडली असती

  56. सर आभारी आहे तुमच्या माहीतुन शेळी पालन कसे करावे याची माहिती पुरेशी मिळाली पण अनुदाना विषयी मागदशन करावे 8007077896

  57. भूपेंद्र पारखे

    धुद उत्पादनासाठी उपयूक्त शेळी कोणती ठरते

  58. MangeshRaje PotarePatil

    मला शेळी पालन करायचे आहे तरी मला त्याची माहीती व्हावी आहे व मला योजना आतरगत लोन हव आहे.9860225056

  59. मला शेळी पालन करायचे आहे मला सरकारी योजना असेल तर कळवा मो. 9665990516

  60. शेळी पालन करायचे आहे मला सरकारी योजना असेल तर कळवा मो.9665990516

  61. Gajanan Mutkule

    Sir,माझ्याकडे शेती आहे परंतु पाणी नाही . मी शेळी पालन करू इच्छितो यासाठी मी 2- 3 लाखाची गुंतवणूक करू शकतो ,तरी मला कोणत्या जातीची शेळी उपयोगी पडेल याची please माहिती दया माझा mob no – 9422109980

  62. सर मला शेळीपालनाविषयी तुमचा अनुभव व शेळीपालनाचा विमा आणि कर्ज विषयीमाहिती दयावी हि नम्र विनंती.

  63. Respected sir, I am a teacher,wanted to start poultry farm as well as “sheli palan” Business so pls give some important basic information about that.

  64. Vikramsinh Parbat

    १) शेळी पालन व्यवसायासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या फायदेशीर आहेत ?
    २) शेळी विक्री साठी बाजारपेठ पत्ता मिळावा .
    ३) शेळ्यांचे शिंगे, खुर, कातडी, विक्री चा पत्ता मिळावा.
    ४) शेळी पालन प्रशिक्षण कोठे मिळेल व त्याची फी व ठिकाण याबद्दल माहिती द्यावी.

  65. अविनाश मिसाळ

    सर मला बंदिस्त शेळी पालन करायचे आहे तरी बंदिस्त शेळी पालना साठी कोणत्या शेळीची नीवड करू. कारण माझ्याकडे शेतामध्ये चारा भरपूर आहे माझ गाव औरंगाबाद जिल्ह्य़ात आहे तरी मला बंदिस्त शेळी पालना साठी माहिती सांगावी. मो.नं.9890304530

  66. धन्यवाद सर,आपण दिलेली माहिती वाचून आत्मविश्वास वाढला.

  67. धन्यवाद सर,आपण दिलेली माहिती वाचून आत्मविस वाढला.

  68. ज्ञानेशेवर वाशिमकर

    सर बंदिस्त शेळी पालन विषयक माहिती द्यावी.

  69. विनायक म्हसे

    तुम्ही दिलेली माहीती सोप्या शब्दात सांगितली, मला पण शेळीपालन कराव़ाचे आहे

  70. दिलीप रोकडे

    सर.मी शिक्षक असून मला बंदिस्त शेळी पालन व्यवसाय करायचा आहे.आमच्या कडे २ एकर शेती अाहे पाण्याची सोय आहेे.तर मला माहीती द्या.माझे गाव सोयगाव तालुक्यातील निंभोरा हे आहे
    मो.9423624759

  71. छान माहीती दिलीत….
    धन्यवाद._/\_
    गोठ्यामधे शेळ्या एकमेकांना मारत आहेत. तरी लहान पिलांचे शिंग नाही यावे याकरिता उपाय सूचना…

  72. जयदेव कापसे

    सर मला बंदिस्त शेळी पालन करायचे आहे तरी बंदिस्त शेळी पालना साठी कोणत्या शेळीची नीवड करू. माझ गाव सोलापूर जिल्ह्य़ात आहे तरी मला बंदिस्त शेळी पालना साठी माहिती सांगावी. मो.नं.7038356153

  73. प्रविण जगन सैंदाने

    सर मला शेळी पालन उद्योगसाठी महिथि हवी आहे कृपया करुण द्या

  74. सर मी डॉ कुटे डी एस

    मला बंदिस्त शेळी पालन करायच आहे माझ गाव नादेड मधे कंधार आहे शेती आहे पण पाणि नाही
    तर मला योग्य माहिती पाहीजे माझा मोबाइल नंबर
    9028903557

  75. सर मी डॉ कुटे डी एस

    सर मला बंदिस्त शेळी पालन करायचे आहे पण आमच्या शेतीत पाणि नाही शेती खुप आहे माझ गाव नादेड मधे कंधार आहे मला माहिती पाहीजे

  76. माऊली सायकर

    सर मी २ महीन्यापासून शेळीपालन चालू केले आहे. माझ्याकडे २० शेळ्या बोअर जातीच्या आहेत. पण मार्केटींगची माहिती नाही. तरी तयार झालेल्या मालाला कोठे न्यावे. आपण मार्गदर्शन करावे
    मो. ९९७५७६७११९

  77. सर खुपच छान. माहीती दिल्या बद्दल धन्यवाद. वाचून आत्म विश्वास वाढला. 8 एकर जमीन आहे पाणीही आहे. सर माझी शेळी पालन करण्याची तीव्र इच्छा आहे. मार्गदर्शन दिले तर आपला सदैव आभारी राहीन. माझी नोकरी सोडण्याची तयारी आहे. मो. नं.9604832521

  78. सर खुपच छान. माहीती दिल्या बद्दल धन्यवाद. वाचून आत्म विश्वास वाढला. सर मी TEXTILE DESIGNER JOB गेली 5 वर्षा पासून कार्यरत आहे. घरची दोन एकर जमीन आहे पाणीही आहे. सर माझी शेळी पालन करण्याची तीव्र इच्छा आहे. मार्गदर्शन दिले तर आपला सदैव आभारी राहीन. माझी नोकरी सोडण्याची तयारी आहे. मो. नं 9604832521

  79. मिलींद पळघामोल

    सर मला तुमची माहीती खुप आवडली माझ्या कडे १० शेळ्या आहेत़ तर मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे तरी मला शासना कडुन काही मदत मिळेल काय व माहीती सागांवे धन्यवाद मो.९८८११८१७०५

  80. भूषण सपकाले

    ही माहिती खुप उत्कृष्ट आहे।
    शेली पालनसाठी किती कर्ज मिलु शकते।
    आणि अफ्रिकन बोअर ह्या शेली विषयी माला माहिती पहिजेय

  81. संतोष जगताप.

    सर खुप छान माहिती मिळाली आभारी आहे.नमस्कार धन्यवाद.

  82. वाचुन खुप वाटले,मला ही हा व्यवसाय करायचा आहे़़
    ८८८८८१९५८७

  83. निलेश राजपूत

    मला बंद कोठ्यातील शेलीपालन करायचे आहे तर कोणत्या जातीच्या बकरी घ्याव्यात

  84. तुमची माहिती मला खूप आवडली
    मला पण शेळी पालन करायचे आहे ….
    9860529730

  85. संतोष उगले

    अनुदान कसे मिलते याबद्दल माहिती हवी धन्यवाद

  86. सर खुपच छान. माहीती दिल्या बद्दल धन्यवाद. वाचून आत्म विश्वास वाढला. सर मी पोलिस खात्यात गेली 15 वर्षा पासून कार्यरत आहे. घरची दोन एकर जमीन आहे पाणीही आहे. सर माझी शेळी पालन करण्याची तीव्र इच्छा आहे. मार्गदर्शन दिले तर आपला सदैव आभारी राहीन. माझी नोकरी सोडण्याची तयारी आहे. मो. नं.7218851952

  87. शेळी पालनासाठी कर्ज कसे घ्यावे मार्गदर्शन करावे.

  88. नमस्कार, अतिशय सुंदर माहिती दिली आहे .
    नवीन पिढीला उपयुक्त ठरेल असे वाटते.

  89. अत्यंत सुंदर माहिती दिली आहे. अनेक नव्या पिढीला माहिती मिळत आहे.
    धन्यवाद

  90. कुठल्या जातीचे शेळ्या खरेदी कराव्यात

  91. कालिदास

    न्यू इंडिया। इन्सुरेंस कंपनी शिवाजीनगर पुणे

  92. purushottam Bharatrao damekar .

    शेळीची कातडी, शिंग, खूड, हाडे आणि केस यांचे विकणारे ठिकाण कोनते व आपण कुटे विकायचे

  93. Shivram deuba masal

    मला शेळी विमा संबंधात महत्त्वाची माहिती हवी आहे

Leave a Comment