मानधनाबाबत नाराज भूतिया

bhutia
मुंबई – भारताचा माजी फुटबॉल कप्तान बायचुंग भूतियाने इंडियन सुपरलीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेसाठी मानधनाच्या पॅकेजबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तथापि, इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेमुळे भारतीय फुटबॉलची हानी हेणार नाही, असेही तो म्हणाला.

फुटबॉलपटूंसाठी इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेसाठी लिलावाची पद्धत अंमलात आणली असती तर अधिक उत्तम झाले असते पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. फुटबॉलपटूंचा लिलाव करण्यात आला असता तर त्याना अधिक रक्कम मिळू शकली असती असेही भूतिया म्हणाला.

आयएसएलतर्फे फुटबॉलपटूंसाठी 15 ते 80 लाख रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे पण आपण यासंदर्भात समाधानी नसल्याचे त्यानी सांगितले. आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलच्या ढाच्यामध्ये बदल होईल याची खात्री मी देऊ शकत नाही. पण या स्पर्धेमुळे भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये काही बदल घडू शकतील, अशी आशा त्याने व्यक्त केली.

Leave a Comment