डोंगरसुळक्यांचे गूढ जंगल

dongar
निसर्गाचा चमत्कार अनेक ठिकाणी पहावयास मिळतो,किंबहुना त्याबाबत नेहमीच गूढ वाटते . असेच एक गूढ जंगल चीनमध्ये आहे. चीनच्या युनान प्रांतात असलेले हे जंगल शिलिन स्टोन फॉरेस्ट नावाने ओळखले जाते.

जंगल म्हटले की, झाडे-झुडपांची दाटी असे चित्र आपल्या डोळ्य़ासमोर उभे राहते, पण हे जंगल झाडांऐवजी डोंगरांनी तयार झाले आहे. या जंगलामध्ये काही डोंगरसुळक्यांची अशी काही रचना आहे की, ती पाहून हा खडकांचा डोंगर नाही तर झाडेच आहेत, असा भ्रम निर्माण होतो. मात्र असे नाही , हे जंगल फक्त डोंगरांनी व्यापलेले आहे, डोंगराच्या सोबतच तिथे विविध प्रकारच्या वनस्पती व झुडपेही आढळून येतात. अर्थात या छोट्या रोपट्यांचे अस्तित्व गगनाला भिडलेल्या व टोकदार डोंगरांच्या पुढे काहीच नाही. हे डोंगरसुळके जंगलाच्या वेगवेगळ्य़ा भागांतून वरती डोकावलेले दिसतात.

Leave a Comment