जमीन घोटाळा; बड्या उद्योगपतींवर गुन्हा दाखल

combo
पुणे : पुणे पोलिसांनी अनेक बडे उद्योगपती आणि माजी जिल्हाधिकाऱयांविरोधात पुणे आणि यवतमाळ येथील जमीन घोटाळयाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात उद्योगपती विनोद गोयंका आणि शहीद बलवा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यासोबतच जमीन घोटाळयाप्रकरणी अन्य 12 जणांविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला असून, खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे सर्व आरोपींवर जवळपास 300 कोटी रुपयांची जमीन हडपण्याचा आरोप आहे. तसेच अन्य 14 जणांसोबत माजी जिल्हाधिकाऱयावरही गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर या 14 लोकांसोबत सरकारला धोका देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment