चिनी शिओमी एमआय थ्री – ३९ मिनिटांत सोल्ड आऊट

xaiomi
भारतीय बाजारात मंगळवारी दाखल झालेला चीनचा शिओमी एमआय ३ फ्लिपकार्टवर अवघ्या ३९ मिनिटांत सोल्ड आऊट झाला असल्याचे समजते. हा स्मार्टफोन ऑनलाईन विक्रीसाठीच उपलब्ध होता मात्र फोन विक्री सुरू होताच ग्राहकांची इतकी गर्दी झाली की त्या लोडमुळे फ्लीपकार्टची साईट कांही तास बंद पडली. गुगलच्या मोटो ई च्या वेळीही अशीच साईट बंद पडली होती असेही समजते.

शिओमीची किती युनिट विकली गेली याचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र नोंदणी च्या काळात म्हणजे १५ जुलै ते २१ जुलै या काळात १ लाख ग्राहकांनी नोंदणी केली होती. फ्लिपकार्टवर या फोनची नोंदणी २२ ते २६ जुलै दरम्यान पुन्हा सुरू होत असून त्याची विक्री २९ जुलैला दुपारी १२ पासून सुरू होणार आहे. या फोनसाठी ५ इंचाचा डिस्प्ले, अँड्राईड किटकॅट ओएस, १६ जीबी इंटर्नल स्टोरेज,१३ एमपी कॅमेरा अशी फिचर्स असून त्याची किंमत आहे १३९९९ रूपये. या फोनने मोटो जी ला तगडे आव्हान दिले असून कंपनीने त्यांचे अन्य दोन फोन रेडमी वन एस आणि रेडमी नोट भारतात अनुक्रमे ६९९९ व ९९९९ रूपयांत उपलब्ध करून दिले आहेत.

Leave a Comment