कॅन्सर दुरुस्त करताना एडस् दुरुस्त झाला

cancer
एडस् दुरुस्त करणे शक्य नाही हे सर्वांना मान्य आहे. एडस् हा विकार एचआयव्ही या व्हायरसमुळे होतो. एखाद्या व्यक्तीला एडस्ची बाधा झाली असेल तर त्याच्यावर ऍन्ट्री रिट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) हा उपचार केला जातो. त्यामुळे एडस् दुरुस्त होत नाही, पण त्या रुग्णाच्या रक्तातील एचआयव्हीचे प्रमाण कमी होते आणि नियंत्रणात राहते. एवढाच फायदा होतो. पण एडस् पूर्ण दुरुस्त होत नाही.

आजपर्यंत तरी जर्मनीतल्या टिमोथी रे ब्राऊन या एकमेव रुग्णाचा एचआयव्ही दुरुस्त झाल्याचे मानले जाते. परंतु त्याच्यावर सुद्धा रक्ताच्या कर्करोगासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन हा उपचार करताना त्याचा एडस् दुरुस्त झाला आहे. म्हणजे कर्करोगासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केले आणि त्या व्यक्तीला एडस् झालेला असेल तर त्याचा एडस् दुरुस्त होऊ शकतो असे मानण्यास जागा आहे.

असे असले तरी सरसकट सर्व एडस् रुग्णांवर बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करता येत नाही. कारण त्यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. ऑस्ट्रेलियामध्ये टिमोथी रे ब्राऊन यासारखाच अन्य एका रुग्णावर बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनचा उपचार केल्यानंतर एचआयव्ही गायब झाल्याचे आढळले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोघा रुग्णांवर सिडनी येथील किर्बी इन्स्टिट्यूट या संस्थेत हे उपचार करण्यात आले. तेव्हा त्या दोघांच्याही रक्तातील एचआयव्ही नष्ट झाल्याचे दिसून आले. या वरून संशोधक आता या निष्कर्षाप्रत येत आहेत की, बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनमुळे एचआयव्ही दुरुस्त होऊ शकत असावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही