लॉर्ड्सवरील विजय संस्मरणीय : धोनी

dhoni
लंडन : भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडविरुद्ध दुस:या कसोटी सामन्यात सोमवारी पाचव्या व शेवटच्या दिवशी 95 धावांनी मिळविलेला विजय संस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळविण्यात यश आल्याचे धोनी म्हणाला.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘आमच्यासाठी हा विजय संस्मरणीय आहे. आमच्या संघातील अनेक खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव नव्हता, पण त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. आमची कामगिरी शानदार झाली. यापूर्वी 2011 मध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पत्कराव्या लागलेल्या पराभवातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. तिस:या दिवसार्पयत सामन्यावर वर्चस्व गाजविणो महत्त्वाचे होते. त्यानंतर आमच्या फिरकीपटूंना वर्चस्व गाजविण्याची संधी होती.’

ईशांत शर्माने सामन्याच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी चमकदार कामगिरी केली. त्याने 74 धावांच्या मोबदल्यात 7 बळी घेत कारकीर्दीतील सवरेत्तम कामगिरी केली. त्याने आखुड टप्प्याच्या चेंडूवर बळी घेतले. त्याला आखुड टप्प्याचा मारा करण्याचा सल्ला दिला होता, अशी कबुली धोनीने यावेळी दिली.
धोनी पुढे म्हणाला,‘पहिल्या सत्रत सवरेत्तम कामगिरी करणो आवश्यक असल्याची प्रचिती आली. अशा वेळी तुम्हाला स्वत:च्या कामगिरीबाबतच शंका येते. उपाहाराच्या अखेरच्या षटकार्पयत ईशांत आखुड टप्प्याचा मारा करण्यास इच्छुक नव्हता. मी त्याला शॉर्ट पिच मारा करण्यास सांगितले. त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

Leave a Comment