रेआल माद्रिदशी करारबद्ध होणार रॉड्रिगेझ

james-rodriguez
माद्रिद – वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सहा गोल करताना ‘गोल्डन बूट’ मिळवणारा कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगेझ रेआल माद्रिदशी करारबद्ध होणार असल्याची चर्चा आहे.

मात्र त्याच्या करारावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून बुधवारी त्याची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. हा करार ६ वर्षाचा तसेच ६ कोटी युरोंचा असल्याचे समजते. रॉड्रिगेझदेखील रविवारपासून माद्रिदमध्येच आहे.

रॉड्रिगेझ सध्या मोनॅकोचे प्रतिनिधित्व करतो. मात्र वर्ल्डकपमधील उल्लेखनीय कामगिरीनंतर त्याला करारबद्ध करण्यासाठी इंग्लिश प्रिमियर लीगच्या क्लबमध्ये ‘रेस’ लागली आहे. लहानपणापासून रेआल माद्रिदकडून खेळण्याचे स्वप्न होते, असे रॉड्रिगेझने यापूर्वी म्हटले आहे. ते पाहता लवकरच स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोसह रॉड्रिगेझ स्पॅनिश ला-लिगामध्ये खेळताना दिसेल.

दरम्यान, रॉड्रिगेझला करारबद्ध करण्यासाठी मोठी रक्कम मोजणार असल्याने रेआल माद्रिद अॅँजेल डी मारिया, इस्को आणि सॅमी खेदिराला ‘ट्रान्सफर विंडो’मध्ये आणू शकतात. त्यातच गेल्या आठवडय़ात जर्मनीचा वर्ल्डकप विजेता सदस्य टोनी क्रूसलाही माद्रिदने मोठी रक्कम मोजून करारबद्ध केले होते.

Leave a Comment