राणे म्हणतात ,माझ्याऐवजी नितेशला विधानसभेचे तिकीट द्या

rane
मुंबई: उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहे, राणे यांनी म्हटले आहे , माझ्याऐवजी मुलगा नितेशला विधानसभेचं तिकीट द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

माझी कोणीच घुसमट करू शकत नाही. मात्र मी निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे माझ्याऐवजी कुडाळ मतदारसंघातून नितेशला विधानसभेचे तिकीट द्यावे , असे राणे यांनी म्हटले आहे .

यावेळी राणेंनी कोकणी माणसासाठी विकासकामे करूनही निलेश राणे निवडून कसे आले नाहीत असा सवालही उपस्थित केला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी नितेश राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्ष दिले आहेत.राणेंनी काल नाराजी जाहीर करून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि राणे यांच्यात चर्चा झाली. मात्र चर्चेनंतरही नारायण राणेंची नाराजी कायम आहे. त्यामुळे आता हायकमांडच्या भेटीशिवाय काही पर्याय नसल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment