म्यानमारमधील चीनचा रेल्वे प्रकल्प रद्द

train
नय प्यी तव्ह – चीनचा म्यानमारमधील नियोजित रेल्वे प्रकल्प म्यानमारी जनतेचा जोरदार विरोध आणि विलंबामुळे रद्द झाला आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे चीनला थेट हिंदी महासागरात प्रवेश मिळणार होता.

या प्रकल्पातंर्गत पश्चिम म्यानमारमधील राखिन आणि चीनच्या कुनमिंग शहरा दरम्यान १२१५ कि.मी.च्या रेल्वे मार्गाचे जाळे उभारण्यात येणार होते. एप्रिल २०११ मध्ये दोन्ही देशांमध्ये यासंदर्भात करार झाला होता. मात्र करार झाल्यानंतर तीनवर्षात कोणतीही प्रगती न झाल्याने अखेर हा रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आला.

चीनकडून दुसरा करार करण्यासाठी कोणतीही हालचाल न झाल्यामुळे करार रद्द झाला असे एका अधिका-याने सांगितले. जनतेची इच्छा आमच्यासाठी महत्वाची आहे. या प्रकल्पामुळे फायद्यापेक्षा तोटेच अधिक असल्याचे जनतेचे मत होते त्यामुळे आम्ही हा प्रकल्प रद्द केला असे या अधिका-याने सांगितले.

Leave a Comment