भूतान मध्ये कार आयातीवरचे निर्बंध उठविले

cars
भारतातील कार उत्पादकांसाठी एक चांगली बातमी आहे. भूतान सरकारने कार आयातीवरील निर्बंध उठविले असल्याचे जाहीर केले गेले आहे. भूतान व्यापार विभागाने नवीन कररचना करताना हे आयात निर्बंध उठविले असल्याचे सांगितले असले तरी त्याबाबतचा अधिकृत अध्यादेश अद्याप जारी झालेला नाही. भूतानच्या या निर्णयाचा मोठा फायदा भारतीय कार उत्पादकांना होणार आहे.

भूतानमधील कार डिलरनी दिलेल्या माहितीनुसार वित्तमंत्री नारबू वांगचुक यांनी १ जुलैपासून कार आयातीवरील निर्बंध उठविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. भूतानमध्ये भारतीय बनावटीच्या कारना अधिक पसंती आहे. निर्बंध उठविण्याच्या घोषणेमुळे आत्ताच नागरिकांनी कार बुकींगला चांगला प्रतिसाद दिला आहे. कांही नागरिकांनी रोख पैसे देण्याची तयारीही दाखविली आहे. मात्र सरकारचे अधिकृत सर्क्युलर येईपर्यंत ऑर्डर घेण्याचे थांबविले आहे. भूतानमध्ये ६८ हजार कार नोंदणीकृत असून त्यातील ३६ हजार कार एकट्या राजधानी थिपू येथेच नोंदविल्या गेल्या आहे.

Leave a Comment