बीएमडब्ल्यूने १६ लाख गाड्या रिकॉल केल्या

bmw
बीएमडब्ल्यू कंपनीने त्यांच्या तीन सिरीज मधील १६ लाख गाड्या जगभरातून रिकॉल केल्या असल्याचे जाहीर केले आहे. प्रवासी साईडच्या एअरबॅग इन्फ्लेटर सदोष असल्याने फ्रंट प्रवासी सीटच्या साईडच्या एअरबॅग मोफत बदलून दिल्या जाणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

या गाड्या मे १९९९ ते ऑगस्ट २००० दरम्यान बनविल्या गेल्या आहेत. या गाड्यात वापरण्यात आलेल्या एअरबॅग सिस्टीमप्रमाणेच अन्य कंपन्यांनी ज्या गाड्या बाजारात आणल्या होत्या त्यातील कांही दुर्घटनाग्रस्त झाल्या असताना या एअरबॅग सदोष असल्याचे आढळले होते. त्यामुळे कोणत्याही ग्राहकाची तक्रार आलेली नसतानाही खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने या गाड्या रिकॉल केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. मे २०१३ मध्ये उत्पादन करण्यात आलेल्या कारमध्येही हीच समस्या होती त्यावेळी कंपनीने ४२ हजार गाड्या परत बोलावल्या होत्या.

Leave a Comment