देशात १०० लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड

soyabean
दिल्ली – देशात सध्याच्या खरीप हंगामाचा विचार करता सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र १00 लाख हेक्टरपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज ‘सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने व्यक्त केला आहे.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)चे प्रवक्ता असलेले राजेश अग्रवाल म्हणाले की, मध्य प्रदेशसह प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये हंगामी पावसाच्या सुरुवातीलाच बियाणांच्या पेरणीने जोर पकडला आहे. सध्याच्या हवामानाची परिस्थती पाहता आमचा अंदाज असा आहे की, देशात या खरीप हंगामात जवळपास १00 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीन पेरले जाणार आहे. इंदोर येथील एका संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, देशात सोयाबीनची ५0 टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. हंगामी पावसाची चांगली परिस्थिती कायम राहिल्यास या महिनाअखेरपर्यंत सोयाबीनची पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘सोपा’च्या अंदाजानुसार, वर्ष २0१३च्या खरीप हंगामात देशात १२0.३३ लाख हेक्टरच्या शिवारात सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली होती.

मध्य प्रदेश देशातील सर्वात मोठे सोयाबीन उत्पादक राज्य आहे आणि राज्य सरकारने सध्याच्या खरीप हंगामात ६५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन लागवडीचे लक्ष्य ठेवले आहे. सोयाबीनच्या राष्ट्रीय उत्पादनात मध्य प्रदेशाची भागीदारी सर्वसाधारणपणे ५0 टक्क्यांच्या जवळपास असते.

Leave a Comment