दर सहा तासांत तोंडाच्या कर्करोगाने एक मृत्यू

tobbaco
कोलकाता : इंडियन डेंटल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी देशातील कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला अधोरेखित करताना, तोंडाच्या कर्करोगाने पीडित दर सहा तासांमागे एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची माहिती दिली आहे. अनेक प्रकरणांमध्ये रोगाचे निदानच होत नसल्याने ही स्थिती अधिक गंभीर होण्याचे भयही त्यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर डॉ. ढोबळे यांनी ग्रामीण व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमध्ये या आजाराची व त्याने होणा:या मृत्यूची नोंद रोखणे अवघड असल्याकडे लक्ष वेधून, भारतात मागील दशकात सिगारेट व तंबाखूच्या वाढत्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगपीडितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे म्हटले.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये तोंडाच्या कर्करोग्यांचे प्रमाण ४० टक्के असून याचसोबत प. बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात व तामिळनाडूसारखी राज्येही या आजाराने ग्रासलेली आहेत. तंबाखूचे व्यसन राज्यांमधील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला असल्याचे आढळून आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment