चीनने विकसित केले डोंगफेंग २१ डी मिसाईल

missle
भारत आणि अमेरिका टप्प्यात येऊ शकतील असे डोंगफेंग २१ डी मिसाईल चीनने नुकतेच विकसित केले असून त्याच्या चाचण्या घेण्यात आल्याचे समजते. २०१० नंतर विकसित करण्यात आलेले दीर्घपल्ल्याचे हे मिसाईल ट्रकमधूनही वाहून नेता येते आणि समुद्रावर १६०० किमी अंतराचा ते अचूक लक्ष्य भेदते असे चीन संरक्षण विभागाचे म्हणणे आहे. याचाच अर्थ हे मिसाईल भारत आणि अमेरिकेवरही प्रहार करू शकते.

डोंगफेंग याचा अर्थ आहे पूर्वकडील हवा. या मिसाईलमुळे चीनची लष्करी ताकद चांगलीच वाढली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकी नौसेना पश्चिम पॅसिफिक महासागर ही त्यांचीच जहागीर असल्यासारखे वर्तन करत आहे. चीनच्या तटापासून अमेरिकी नौका ३ किमी अंतरावरून गस्त घालत असतात. त्यामुळे चीनने गुपचूप आपली ताकद वाढविली आहे. आपल्या ५० पाणबुड्यांच्या ताफ्यात दरवर्षी तीन नवीन पाणबुड्या चीन दाखल करत आहे.

चीनची वाढलेली ताकद जपान, व्हीएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया या शेजारी देशांसाठी धोकादायक बनल्याने या देशांनीही त्यांची संरक्षण क्षमता वाढविण्यास सुरवात केली आहे. चीनने विकसित केलेल्या नव्या मिसाईलमधून एकाचवेळी शेकडो छोटे बॉम्ब डागता येतात आणि भूभागाप्रमाणेच विमाने, रडार यांचा वेध हे मिसाईल दूर अंतरावरूनही घेऊ शकते.

Leave a Comment