एक झोका;पण १३०० फुट उंचीवरून

jhoka
कोण काय करेल आणि कोणाच्या डोक्यात कोणती कल्पना येईल याचा काही नेम नाही. घराच्या छताला वा झाडाला बांधलेल्या झोक्यावर झुलण्याचा आनंद आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. त्याची उंची फार झाली तर १0-२0 फुटांची असते. पण अमेरिकेच्या कोलेरॅडो प्रांतातील ग्लेनवू स्प्रिंगमधील अँडव्हेंचर पार्कात एक झोका तब्बल १३00 फूट उंच आहे. आणि हवा आणि वायूच्या दबावामुळे ताशी ८0 किलोमीटरच्या भन्नाट गतीने हा झोका चालतो. त्याच्या आवर्तनातून ११२ अंशाचा कोन तयार होतो. या झोक्यावर एकावेळी लोक झुलण्याची मजा घेऊ शकतात. अँडव्हेंचर पार्कचा मालक स्टीव बेकले याने सांगितले की, ज्यावेळी तुम्ही या झोक्यावर झुलत असता तेव्हा खाली १३00 फूटावरचा नजारा पाहून साहजिकच कुणाचेही डोळे फिरू शकता. या सगळ्य़ात उंच झोक्याची रचना करणार्‍या स्टीव याला त्याच्या या उपक्रमाकडे लोक फारसे आकर्षित होणार नाहीत, असे सुरुवातीस वाटले होते, पण त्याला जसा प्रतिसाद मिळत आहे ते पाहून तोही थक्क झाला आहे. खरेतर तिथे रोलर कोस्टर साकारण्याची स्टीवची योजना होती, मात्र लोकांना काहीतरी वेगळे देण्याच्या विचारातून ही कल्पना त्याला सुचली.

Leave a Comment