इस्रायल गाझापट्टीवर हल्ले सुरू ठेवणार

gaza
गाझा – हमास शासित गाझापट्टीवर हल्ले जारी ठेवण्याची शपथ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घेतली आहे. तर तत्काळ प्रभावाने युद्धविराम लागू करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने केले आहे. दोन आठवडय़ांपासून जारी या संघर्षात इस्रायलचे १८ सैनिक तर पॅलेस्टाइनचे ५०१ सामान्य नागरिक मारले गेले आहेत. ३१०० पेक्षा अधिक लोक या संघर्षात जखमी झाले आहेत.

कतारमध्ये पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांची संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांनी भेट घेतली आहे. सध्या पश्चिम आशियाच्या दौऱयावर मून आहेत. १५ देशांच्या या शक्तिशाली परिषदेने एक आपात बैठक घेतली आणि गाझामध्ये चाललेल्या हिंसेच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Comment