आता हिंदीतही गुगल मॅप

map
जयपूर – लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने त्यांची गुगल मॅपची सुविधा हिंदीमध्ये सुरु केली असून हिंदी भाषेत मॅपची सुविधा सुरु केल्यामुळे लोकांना वापरण्यास सोयीस्कर ठरणार आहे.

गुगलच्या हिंदी मॅपचा वापर कम्प्युटर्स आणि अँड्रॉईड यूझर्स करु शकतात. गुगलच्या या हिंदी मॅपमध्ये शहरे, महत्त्वाचे रस्ते, मार्ग यांची सर्व माहिती हिंदीमध्ये तुम्ही पाहू शकता. तसेच काही महत्त्वाची ठिकाणे, शाळा, उद्याने यांचीही माहिती हिंदी भाषेत देण्यात आली आहे.

जयपूर येथे गुगलचे व्यवस्थापकीय संचालक सुरेन रुहेला यांनी या मॅपचे लाँचिंग केले. तसेच गुगलच्या हिंदी भाषेतील मॅपचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास मॅपची सुविधा अनेक प्रादेशिक भाषांमध्येही सुरु केली जाणार असल्याचे रुहेला यांनी सांगितले.

सध्या लोक गुगलचा मॅपचा वापर करत आहेतच मात्र हिंदी भाषेत मॅपची सुविधा सुरु केल्याने अधिक लोकांना याचा फायदा होईल आणि मोठया प्रमाणात याचा विस्तारही होईल, असा विश्वास रुहेला यांनी व्यक्त केला.

Leave a Comment