दक्षिण कोरियन इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंगने त्यांचा गॅलॅक्सी रेंजमधील एस ६ स्मार्टफोन मार्च २०१५ मध्ये बाजारात आणला जात असल्याचे जाहीर केले आहे. सॅमसंगने हायएंड ते मिडल लो एंड रेंजमध्ये अनेक प्रकारचे स्मार्टफोन आजवर बाजारात आणले असून जागतिक बाजारावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोनला जगभरातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
सॅमसंगचा गॅलॅक्सी एस ६ मार्चमध्ये येणार
मार्च २०१५ ला बाजारात आणल्या जाणार्या गॅलेकसी एस ६ मध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाबद्दल विशेष चर्चा केली जात आहे. अॅल्युमिनियमची बॉडी, ५.५ इंचाचा सुपर अमोलेड स्क्रीन, सॅमसंगने विकसित केलेला कर्व्हड अथवा फलेक्सिबल डिस्प्ले, २० मेगापिक्सलचा कॅमेरा, ७.४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ६४ जीबीची इंटरर्नल मेमरी, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, फिंगरप्रिंट स्कॅनर, १२८, २५६ जीबी चॉईस इंटरनल स्टोरेज अशी त्याची वैशिष्ठ्ये असल्याचे वृत्त आहे.