नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्टिज लिमिटेडला निव्वळ नफा 13.7 टक्क्यांनी वाढून जवळपास 1 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. एका तिमाहीत खासगी क्षेत्राच्या कोणत्याही कंपनीद्वारे प्राप्त केलेला हा विक्रमी नफा आहे. रिफायनिंग मार्जिन वाढण्याबरोबरच कंपनीच्या पेट्रोकेमिकल व्यवसायातदेखील उत्पन्न वाढले आहे. अमेरिकेत शेल गॅसच्या व्यवसायातदेखील वृद्धी प्राप्त झाली आहे.
पहिल्या तिमाहीत रिलायन्सला १ अब्ज डॉलर्सचा नफा
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (आयआरएल) द्वारे जारी पत्रकानुसार एप्रिल ते जून 2014 च्या तिमाहीत कंपनीचा शुद्ध नफा 13.7 टक्क्यांनी वाढत 5957 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने मागील वर्षाच्या याच तिमाहीत 5237 कोटी रुपयांचा नफा कमविला होता. या आधारावर मागील वर्षी कंपनीने प्रति समभाग 17.80 रुपयांचा नफा कमविला तर यावर्षीच्या तिमाहीत हे 20.30 रुपये प्रति समभाग एवढे आहे.