निवृत्त होणार इंग्लंडचा कर्णधार गेरार्ड

gareala
लंडन – आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार स्टीव्हन गेरार्डने निवृत्तीची घोषणा केली असल्याचे फुटबॉल असोसिएशनने जाहीर केले.

इंग्लंडतर्फे 114 सामन्यांत लिव्हरपूलच्या या मिडफिल्डरने प्रतिनिधित्व केले. 2000 मध्ये त्याने वेम्ब्लीत झालेल्या युक्रेनविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. इंग्लंडने तो सामना 2-0 असा जिंकला होता. `देशाचे प्रतिनिधित्व करताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. त्यामुळे यापुढे मला इंग्लंडची जर्सी घालता येणार नाही याचे खूप वाईट वाटत आहे,’ असे त्याने एफएच्या वेबसाईटवर म्हटले आहे. ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. मोठय़ा स्पर्धेत देशातर्फे खेळण्याची त्याची ही सहावी वेळ होती. मात्र या स्पर्धेत त्याच्या संघाला प्राथमिक फेरीतूनच बाहेर पडावे लागले.

Leave a Comment