दुखापतग्रस्त मॅट प्रायोर मालिकेतून बाहेर

matt-prior
लंडन – भारत आणि इंग्लडदरम्यान सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून इंग्लड संघाचा विकेटकीपर मॅट प्रायोर याने दुखापतीमुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याने या मालिकेतून हाताच्या तसेच टाचेच्या दुखापतीमुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लडदरम्यानच्या दुस-या कसोटी सामन्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला. या सामन्यात इंग्लडला भारताकडून ९५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

‘यापुढच्या तीन कसोटी मालिकेत मला खेळता येणार नाही. त्यानंतर फिट झाल्यानंतर मी पुन्हा खेळण्यास सुरुवात करेन. हा खरंच मोठा निर्णय आहे, असे प्रायोरने यावेळी सांगितले. तसेच त्याने त्याच्या बदली खेळवल्या जाणा-या जोस बटलरला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment