तेलंगणा करणार सानिया मिर्झाला एक कोटींची मदत

sania-mirza
हैद्राबाद – टेनिसस्टार सानिया मिर्झाला आंध्रप्रदेशातून वेगळे होऊन नव्यानेच उदयास आलेल्या तेलंगणाने राज्याने एक कोटी देणार असल्याचे जाहिर केले आहे. सानियाच्या प्रशिक्षणासाठी ही मदत देण्यात येणार आहे.

ही मदत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहिर केली. टेनिस विश्वात सानिया मिर्झा ही पाचव्या स्थानावर आहे. तिच्या प्रशिक्षणासाठी तसेच येत्या यूएस ओपनसह इतर टूर्नामेंटसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे.

सानियाच्या हाती तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने लवकरच या रकमेचा धनादेश सूपूर्द करण्यात येणार आहे. नव्याने उदयास आलेल्या या राज्याला एक वर्षही झाले नसताना ही मदत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सानिया मिर्झा ही श्रीमंत घरातील असून काही वर्षापूर्वीच तीने पाकिस्तानचा क्रिकेट पटू शोएब मलिकशी विवाह केला आहे. देशात अनेक नवोदित आणि होतकरु खेळाडूंना मदतीची गरज असताना सानियाला मदत केल्याने क्रिडा क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave a Comment