टेनिसपटू डोल्गोपोलोव्हवर शस्त्रक्रिया

Alexandr-Dolgopolov
हॅम्बुर्ग – अमेरिकन खुल्या हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत टेनिसपटू अलेक्झांडर डोल्गोपोलोव्ह याच्या गुडघ्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने तो सहभागी होऊ शकणार नाही. डोल्गोपोलोव्हच्या गुडघ्याला हॅम्बुर्ग टेनिस स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्याने तो लवकरच शस्त्रक्रिया करून घेणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्याला किमान सहा आठवडे पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल.

Leave a Comment