झुरळामुळे ‘राजधानी एक्स्प्रेस’ एक तास रोखून धरली

rajdhani
नवी दिल्ली : देशातील सर्वोत्तम प्रवासी रेल्वे मानल्या जाणार्‍या ‘राजधानी एक्स्प्रेस’मध्ये प्रवाशांना दिलेल्या जेवणात झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे झुरळावरून सुमारे एक तास रेल्वे जागेवरच थांबली.

कोलकाता येथून नवी दिल्लीला जात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील प्रवाशाला दिलेल्या रेल्वे कॅन्टीनच्या जेवणात झुरळ आढळल्यानंतर संतापलेल्या प्रवाशांनी गोंधळ घालत सुमारे एका तासापर्यंत रेल्वे रोखून धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोलकाता येथून नवी दिल्लीला निघालेल्या राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना रविवारी रात्री पाटणा रेल्वे स्थानकावर जेवण देण्यात आले. यावेळी एका प्रवाशाच्या जेवणात झुरळ आढळून आले. यावर संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वेत गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. यावेळी प्रवाशांनी मुगलसराय रेल्वे स्थानकावर तब्बल एक तास रेल्वे रोखून धरल्याचे सूत्रांनी सांगितले. जेवणात झुरळ कोठून आले तसेच सर्व खाद्यपदार्थांची योग्य तपासणी करण्यात आली नाही का, असे प्रश्न उपस्थित करीत प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.

Leave a Comment