स्विस बँकेत भारतीय बनावट नोटा

currancy
बर्न – काळ्या पैशांबाबत चर्चा सुरू असतानाच स्वित्झर्लंडमध्ये लपवण्यात आलेल्या बनावट चलनामध्येही भारतीय रुपयाचा तिसरा क्रमांक असल्याचे समोर आले आहे. भारतीय रुपयाचा क्रमांक युरो आणि अमेरिकन डॉलरखालोखाल बनावट चलनामध्ये लागत असल्याची माहिती स्वित्झर्लंडच्या संस्थेने दिली आहे.

याविषयीची आकडेवारी स्वित्झर्लंडच्या फेडरल पोलिस खात्याने (फेडपोल) जाहीर केली आहे. त्यानुसार स्वित्झर्लंडमध्ये २०१३ साली पकडण्यात आलेल्या बनावट चलनापैकी युरोच्या दोन हजारावर नोटा, अमेरिकन डॉलर्सच्या हजार नोटा, तर भारतीय रुपयांच्या ४०३ नोटा आहेत. बनावट भारतीय नोटांपैकी ३८० नोटा ५०० च्या, तर २३ नोटा १,०००च्या होत्या. तथापि, २०१२ च्या तुलनेत पकडलेल्या बनावट भारतीय नोटांच्या संख्येत घट झाली आहे. २०१२ मध्ये ‘फेडपोल’ने २,६२४ बनावट भारतीय नोटा पकडल्या होत्या. त्या वर्षात आंतरराष्ट्रीय बनावट चलनामध्ये भारतीय रुपयाचे स्थान अमेरिकन डॉलरखालोखाल (५२८४ नोटा) दुसरे होते.

Leave a Comment