लॅपटॉपची बॅटरी होते गूगल क्रोममुळे लो!

chrome
मुंबई – जर का तुम्ही लॅपटॉपवर गूगल क्रोम वेब ब्राउजर वापरत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी लवकर सपंत असेल, तर त्याचं कारण गूगल क्रोम असू शकते.

फोर्ब्सवर इऑन मॉरिसने या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, “गूगल क्रोम दूसऱ्या इंटरनेट ब्राउजर पेक्षा जास्त बॅटरी खर्च करतो”.

क्रोमच्या ज्यास्त बॅटरी खर्च करण्यामागचे कारण ‘सिस्टम क्लॉक टिक रेट’ आहे. क्रोमला जेव्हा ओपन केले जाते, तेव्हा हा रेट 1 मिलीसेकंदांवर सेट होतो. पण विंडोज़वर सामान्यपणे हा रेट 15.625 मिलीसेकंद असला पाहिजे.

विंडोज़प्रमाणे ओएसमध्ये काही ठराविक वेळेनंतर इवेंट्स सेट होतात. गरज नसताना पावर वाचवण्यासाठी प्रोसेसर स्लीप मोडमध्ये जातो आणि पूर्वनियोजित वेळेत पुन्हा स्लीप मोडमधून बाहेर येतो.

क्रोम विंडोजमध्ये ही वेळ कमी करून 1 मिलीसेंकद करतो. म्हणजेच सिस्टम 15.625 मिलीसेकंद या वेळेच्या खूप आधीच 1 मिलीसेकंदवर स्लीप मोडमधून बाहेर येतो. यावरून असे म्हणू शकतो की, एक मिलीसेकंद या रेटवर प्रोसेसर एका सेकंदामध्ये 1000 वेळा स्लीप मोडमधून बाहेर येतो आणि डिफॉल्ट मोडच्या 15.625 मिलीसेकंदमध्ये प्रोसेसर ज्यावर विेशेष लक्ष दिलं जात नाही, अशा इवेंट्सला चेक करण्यासाठी एका सेकंदामध्ये फक्त 64 वेळा स्लीप मोडमधून बाहेर येतो.

माइक्रोसॉफ्टने स्वतः असे म्हटले आहे की, 1 मिलीसेकंद टिक रेट म्हणजे 25 टक्के जास्त पावर खर्च होते. मग दूसरे ब्राउजर किती बॅटरी खर्च करते? जर तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर (आईई)चं नवं वर्जन वापरत असाल, तर टिक रेट तेव्हापर्यंत 15.625 मिलीसेकंदच राहतो जोपर्यंत ब्राउजरला काही खास कारणापर्यंत वाढवावे लागत नाही. जेव्हा तुम्ही आईईवर यूट्यूबवर व्हिडिओ बघता तेव्हा हा रेट 1 मिलीसेंकद होतो. त्या टॅबला बंद करून फक्त इंटरनेट ब्राउजिंग करत असाल तर हा रेट पुन्हा 15.625 मिलीसेकंद होतो. पण क्रोम ब्राउजर उघडताच हा 1 मिलीसेकंद होतो आणि तोपर्यंत राहतो जोपर्यंत तुम्ही ब्राउज़र पूर्णपणे बंद करत नाही.

सगळयात ज्यास्त वेब ब्राउज़रमध्ये गूगल क्रोम वापरले जाते. जगात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांमध्ये 35 टक्के लोक गूगल क्रोम वापरतात. जर तुम्हाला चांगली बॅटरी लाइफ हवी असेल तर जोपर्यंत गूगल याला दुरूस्त करत तोपर्यंत तुम्ही दूसरे ब्राउजर वापरू शकता.

Leave a Comment