जपानच्या ईशान्य किनारपट्टीला भूकंपाचा धक्का

earthquake
टोकियो – सोमवारी पहाटे ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने जपानची ईशान्य किनारपट्टी हादरली. हे भूकंपाचे धक्के पहाटे अडीचच्या सुमारास जाणवले. मात्र या भूकंपामध्ये कुठल्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी झालेली नाही.

या भूकंपाचा केंद्रबिंदू जपानच्या ईशान्य भागातील होक्कायडो बेटापासून ६० कि.मी. अंतरावर प्रशांत महासागरात होता. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळच रशियाचे कुरील बेट आहे. कुरील बेट केंद्रबिंदूपासून ९४ कि.मी. अंतरावर आहे.

कुरील बेटावरुन जपान आणि रशियामध्ये वाद आहे. या बेटावर सध्या रशियाचे नियंत्रण आहे. दुस-या महायुध्दाच्या अखेरच्या दिवसात रशियन फौजांनी या बेटावर नियंत्रण मिळवले होते. दक्षिण कुरील हा जपानचा भूभाग असल्याने चारही बेटे आपल्याला परत करावीत अशी जपानाची मागणी आहे. मात्र रशिया या भागावरुन आपला ताबा सोडायला तयार नाही.

Leave a Comment