कसा घ्याल वायफाय हॅकर्सचा शोध

wifi
मुंबई – स्मार्टफोन युजर्स कुठेही वाय-फाय नेटवर्कचा ओपन सोर्स मिळाला की त्यावर तुटून पडतात. मोफत वायफाय वापरायला मिळत असेल तर कुणाला नको? असे हॅकर्स घर तसेच खासगी कंपन्यांच्या वाय-फाय नेटवर्कचा पासवर्ड तोडण्याचाही प्रयत्नात असतात. तुमच्याही वाय-फाय नेटवर्कचा गैरवापरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या हॅकर्सचा आता तुम्हीही शोध घेवू शकता.

जर कोणी तुमच्या वाय-फाय नेटवर्कचा गैरवापर करत असेल तर इंटरनेटचा स्पीड स्लो होते. जे लोक आपल्या खासगी वाय-फाय नेटवर्कच्या माध्यमातून सीक्रेट फोल्डर शेअर करतात, ते चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी वाय-फाय हॅक करून बेकायदा कामे देखील केली जाऊ शकतात. वाय-फाय नेटवर्क हॅक झाल्याचे अनेकदा युजर्सना कळतही नाही.

मात्र, आता घरी बसल्या तुम्ही देखील हॅकर्सचा शोध घेऊ शकतात. आपल्या वाय-फाय राउटरमध्ये अनेक लाईट पेटताना दिसतात. त्यातील एक इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा, एक लॅन आणि आणखी एक वायरलेस डिव्हाइसचा असतो. तुमचे वाय-फाय दुसरा कोणी वापरत आहे का? याचा शोध घेण्यासाठी सर्व वायरलेस डिव्हाइस बंद करावे.

लॅपटॉप, कॉम्प्यूटर, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही सारखे सर्व डिव्हाइस जर बंद केले, तर चार पैकी तीन लाइट बंद होतील. डिव्हाइस बंद केल्यानंतरही लाइट सुरुच असतील तर समजावे तुमच्या वाय-फायचा गैरवापर होत आहे. हा उपाय सोपा आहे. परंतु अचूक आहे, असे म्हणता येणार नाही.

अनेकदा स्पार्ट डिव्हाइस बंद केल्यानंतरही ते मॉडेमशी कनेक्ट राहतात. तांत्रिकदृष्ट्या हा उपाय थोडा फायदेशीर ठरू शकतो. आपल्या राउटरवर डिव्हाइस लिस्ट चेक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी IP अॅड्रेस तपासणे आवश्यक आहे.

सगळ्यात आधी कमांड प्रॉम्प्टवर Win+R ची मदत घ्यावी. यानंतर विंडोमध्ये ipconfig टाइप करावे, नंतर आपल्याला डिफॉल्ट IP अॅड्रेसबाबत समजू शकेल. आता ब्राउझरमध्ये जाऊन IP अँड्रेस टाइप करावा. नंतर ब्राउझर तुम्हाला राउटर मध्ये लॉगइन करण्यास सांगेल. जर तुम्ही राउटरची डिफॉल्ट सेटिंग्स बदलली नसेल तर याचा आयडी “admin” आणि पासवर्ड “password” असेल.

लॉगइन केल्यानंतर राउटरचा पासवर्ड आणि आयडी बदलणे आवश्यक असते. पासवर्ड तोच ठेवल्याचे हॅकर्स सहज राउटरवर अटॅक करू शकतात. राउटरवर लॉगइन केल्यानंतर आपला कनेक्टेड डिवाइस (connected devices) अथवा अटॅच डिव्हाइस (Attached Devices) सेक्शनवर क्लिक करणे आवश्यक असते. अनेक राउटर्समध्ये हे Device List च्या नावानेही असते.

या लिस्टमध्ये तुमच्या वाय-फायशी किती युजर्स कनेक्ट आहेत याची संपूर्ण माहिती मिळते. यावरून तुमचे वाय-फाय कोण वापरत आहे. याची माहिती मिळते. वाय-फायचा कोण गैरवापर करत आहे. याचा शोध घेण्यासाठी इंटरनेटवर अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने वाय-फाय इंटरनेट चोरांचा शोध घेता येतो.

Leave a Comment