आता नेटवर्क नसतानाही करू शकता चॅट

gotenna
मुंबई – नेटवर्क प्रॉब्लमला बहुतांश लोक सामोरे जातात. कधी कधी तर ऐन कामाच्या वेळेसच नेटवर्क गायब होऊन जाते. पण आता तुम्ही नेटवर्क नसले तरीही चॅट करू शकता, एवढंच नाही तर ऑफ लाइन मॅपवर लोकेशन ही शेयर करू शकतात आणि हे शक्य झाल आहे गोटेना मुळे. गोटेना (GoTenna) हे 5.8 लांबी,1 रूंदी, 0.5 इंच जाडी असलेले 57 ग्रॅमचे एक डिवाइस आहे.

गोटेना ब्लूटूथ लो-एनर्जीने स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो. हा तुमच्या स्मार्टफोनशी 20 फूट अंतरापर्यंत कनेक्ट होऊ शकतो.गोटेना तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट झाल्यानंतर गोटेनाच्या फ्री-अॅपवर तुम्ही मॅसेज पाठवू शकतात. जो गोटेनावर जाईल नंतर तो मॅसेज लॉन्ग-रेंज वेव्स मार्फत तुम्हांला ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे त्या व्यक्तीच्या स्मार्टफोनपर्यंत जाईल.

कंपनीनुसार हे सगळे काही मिली सेकंड्स मध्ये होते. गोटेनाची रेंज 50 मैल (80 किमी) आहे. या रेंजमध्ये एक गोटेना यूज़र दूसरया गोटेना यूज़रशी कम्यूनिकेट करू शकतो.

गोटेना हे टिकाऊ धातु, नाइलॉन आणि सिलिकन पासून बनले आहे. हा वॉटर-रेजिस्टेंट आणि डस्ट-टाइट आहे. यामध्ये सर्किट बोर्ड, रेडियो चिप्स, कस्टम एंटिना आणि माइक्रो-यूएसबी केबलने चार्ज होणारी लिथियम-आयन बैटरी आहे.

हा डिवाइस जोडीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2 यूनिट (एक जोडी) ची कींमत 299.99 डॉलर आहे. पण प्री-ऑर्डर वर 50% सूट वर हा डिवाइस तुम्हाला 149.99 डॉलर म्हणजेच 9000 रू. ला मिळेल. याची शिपिंग 2 ते 3 महिन्यात सुरू होईल.

Leave a Comment