मनिला- फिलिपीन्समध्ये आलेल्या ‘रम्मासन’ चक्रीवादळात ९४ जणांचे बळी गेले असून ६ जण बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच फिलिपिन्समध्ये पुन्हा ‘मातमो’ या नवीन चक्रीवादळाने थैमान घातले आहे.
‘मातमो’ चक्रीवादळात १०० बळी
फिलिपिन्समध्ये दक्षिण चीनच्या समुद्रात आलेल्या ‘मातमो’ वादळामुळे वादळी वा-यांसह पाऊस पडत आहे. मनिला शहरातील चार लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती मनिला इलेक्ट्रीक कंपनीने दिली. मात्र, नवीन वादळामुळे नेमके किती जणांचे बळी गेले याची निश्चित माहिती नाही.