चिप्सचा मोह आवरता येत नाही – बराक ओबामा

obama
आरोग्यदायी आणि पोषक पदार्थांचे आहारातील महत्त्व मला कळते मात्र तरीही चिप्स आणि कांदा घालून केलेले मसालेदार पदार्थ समोर आले की मी ते खाण्याचा मोह आवरू शकत नाही अशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मुलांसाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीच्या वेळी दिली.व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी असे किडस डिनर आयोजित केले जाते.

हेल्दी लंचटाईम चॅलेंज नावाची एक स्पर्धा अमेरिकेत आयोजित केली जाते. आरोग्यपूर्ण आणि सकस जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा होते. यंदा या स्पर्धेत विजयी ठरलेल्या ५४ मुलांना व्हाईट हाऊसमधील किडस डिनरला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना ओबामांनी त्यांना चिप्स आवडतात तर फर्स्ट लेडी मिशेल ओबामा फे्रच फ्राईजच्या दिवान्या असल्याचेही सागितले. ओबामा कन्या मलिया आणि साशा आईस्क्रीम, सुशी आणि पाय पसंत करतात अशीही माहिती ओबामांनी या मुलांना दिली. मात्र आपल्या आवडी सांगताना त्यांनी मुलांनी खाण्याच्या चांगल्या सवयी लागण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवा असा सल्लाही दिला.

Leave a Comment