अजित पवारांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा

ajit
सोलापूर: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १४४ जागा मिळाल्या; तरच काँग्रेसबरोबर आमची आघाडी राहॆल. अन्यथा आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे; असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी आणि जागावाटप या संदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार एकमेकांशी विसंगत विधाने करून राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण करीत आहेत. नुकतेच शरद पवार यांनी काँग्रेस रहाण्याची ग्वाही देताना स्वबळावर लढण्याची भाषा करणा-या अजित पवार यांचे होते. मात्र अजित पवार यांनी येथे बोलताना पुन्हा १४४ जागांची आग्रही मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राज्यातील दोन्ही काँग्रेसचे पानिपत झाले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ पैकी काँग्रेसला केवळ २ आणि राष्ट्रवादीला ४; अशा केवळ ६ मतदारसंघात विजय मिळाला. त्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्या निकालाची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष काँग्रेसपासून दूर पळत आहेत. काँग्रेसबरोबर असलेल्या काश्मीरमधील नेशनल कॉन्फरन्सने नुकताच काँग्रेसपासून काडीमोड घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे काँग्रेसवर दबाव आणून जास्त जागा मिळविण्यापुरते स्वबळाचे राजकारण करणार की काँग्रेसपासून फारकत घेउन खरोखरच स्वबळावर लढण्याची तयारी करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Leave a Comment